परशुराम घाटात पुन्हा वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी ते आंबडस या मार्गावर यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करून वाहतूक सुरळीत केली आहे.दरड कोसळल्यामुळे परशुराम घाटातील रस्त्यावर आलेला चिखल काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सध्या या ठिकाणाहून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तरीही अधिक दरड खाली येण्याचा धोका आहे. त्यामुळे परशुराम घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.परशुराम डोंगराची माती रस्त्यावर आल्यामुळे सकाळी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र चार तासाच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. पुन्हा अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावात करण्यात आलेल्या मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.
ML/KA/PGB 9 May 2023