समृद्धी महामार्ग बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

 समृद्धी महामार्ग बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला

नाशिक, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिन्नर ते घोटी दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर पथावर सुरु आहे. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तऱ्हाळे ते गांगडवाडी परिसरातील समृद्धी महामार्गाचा ब्रिज काम सुरू असताना अचानक कोसळला आहे. सुदैवाने सायंकाळच्या सुमारास काम बंद असल्याने जीवितहानी टळली आहे. समृद्धी महामार्ग उद्घाटनापासूनच या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. उद्घाटन झाल्यानंतर १२० च्या गतीने वाहने धावत आहेत. मात्र अपघातांच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. अशातच इगतपुरी परिसरात बेळगाव तऱ्हाळे गावानजीक ब्रिजचं काम सुरू आहे. मात्र प्रगती पथावर असलेला ब्रिज अचानक कोसळल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यावर असलेला ब्रिज कोसळल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.इगतपुरी तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून समृद्धी महामार्गावरून जाणारा बेलगाव तऱ्हाळे आणि गांगडवाडी या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी काम सुरू होते, तो समृद्धीचे काम सुरू असलेला रस्ता असल्याने तेथे वर्दळ नव्हती. सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पुलाच्या चार लेनचे पिलर एका उभ्या असलेल्या पिलरवरून दुसऱ्या पिलरवर बसविण्याच्या प्रयत्नात खाली आले. या पुलाचा जवळपास २०० ते २५० मीटरचा भाग अचानकपणे समृद्धी महामार्गावर कोसळला. मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, समृद्धी महामार्गाचे काम कसेतरी उरकले जात असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

ML/KA/PGB 9 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *