पोलीस भरती परिक्षेत फसवणूक करणाऱ्या परिक्षार्थी विरोधात गुन्हा दाखल
मुंबई दि.8( एम एमसी न्यूज नेटवर्क):पोलीस भरती लेखी परीक्षेत कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून , डिवाइसच्या साहाय्याने कॉपी करताना आढळून आलेल्या दोन परिक्षार्थी विरोधात भांडूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.रविवारी पोलीस भरती लेखी परीक्षा सुरू असताना भांडूप (प.) येथील व्हिलेज रोड वरील ब्राईट स्कूल येथील परीक्षा केंद्र क्रमांक 07 02 रूम नंबर 210 मध्ये एक परीक्षार्थी क्र.36215 बबलू मदनसिंग मेंढरवाल (वय 24 )व नितेश रघुनाथ आरेकर (वय 29) दोघेही रा. इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना हे दोघे त्याच्या कानात सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर करून सदर डिवाइसच्या साहाय्याने कॉपी करताना आढळून आले . पोलिसांनी या दोन परिक्षार्थीना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात भांडूप पोलीस ठाण्यात कलम 417,419,420,34 भा द वि सह कलम 7,8 महाराष्ट्र विद्यापीठाच्या, मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ML/KA/PGB 8 May 2023