महिला पत्रकार भावना किशोर यांना पंजाबमध्ये अटक
पंजाब, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टाईम्स नाऊ नवभारत महिला पत्रकार भावना किशोर यांना पंजाबमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. भावना यांच्या कारने एक महिला जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पत्रकार भावना किशोर या कारमध्ये मागे बसल्या होत्या आणि तिच्यावर एससी-एसटी कायदा लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
‘ऑपरेशन शीशमहल’चा खुलासा झाल्यानंतर या वाहिनीच्या पत्रकाराला रोड रेज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी भावना किशोर, मृत्युंजय कुमार, परमिंदर यांना चुकीच्या कलमांखाली अटक केल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने पत्रकारासह तिघांनाही १९ मेपर्यंत तुरुंगात पाठवल्याचे वृत्त आहे.Woman journalist Bhavna Kishore arrested in Punjab
ML/KA/PGB
7 May 2023