पैलवान मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक झालीच पाहिजे
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करत आम आदमी पार्टी, मुंबईच्या वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील कदम नगर येथे आज आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपा सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी कार्याध्यक्ष रूबेन मस्कारेन्हस उपाध्यक्ष पायस वर्गीस, संजय बेडिया, नीता सुखटणकर तसेच मुंबई नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मुंबईतील नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, देशाच्या मुली ज्या विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये देशाचे नाव उज्वल करतात, ह्या न्याय मिळावा म्हणून मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पण केंद्रातील सत्तेमध्ये बसलेले नेते अत्याचार करणाऱ्या नराधमाला वाचवायचा प्रयत्न करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर साधे भाष्य सुद्धा करत नाहीत. असा कोणता पंतप्रधान असू शकतो ज्याला हे कळत नाही. ज्या मुलींनी संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचे नाव उज्वल केले, आपल्या तिरंग्याची शान ज्यांनी वाढवली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संकोच वाटतो. जो त्यांना न्याय मिळवून देऊ शकत नाही अशी व्यक्ती पंतप्रधान असूच शकत नाही. तो फक्त एक अहंकारी व देशद्रोही माणूस आहे, जे देशासाठी अत्यंत घातक आहे. आमची मागणी आहे की अत्याचार करणाऱ्या ह्या नराधमाला अटक झालीच पाहिजे. भाजपचे लोकसभा सदस्य ब्रिजभूषण शरण सिंग ह्यांच्यावर आपल्या देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटुंवर अत्याचार केल्याचे आरोप असून, सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या विरुद्ध एफआयआरचा आदेश दिला आहे. तरीही केंद्र शाशित दिल्ली पोलिस अजून त्यांना अटक करत नाहीयेत. भाजप एका गुन्हेगारापुढे इतकी हतबल का आहे? एवढेच नाही तर दोन दिवसांपूर्वी, पावसामुळे आंदोलन करणाऱ्या आपल्या खेळाडूंचे अंथरूण भिजले तर त्यांना पोलीस पर्यायी व्यवस्था ही करू देत नव्हते. उलट तिथे जमलेल्या पत्रकारांना मारहाण केली. अत्यंत निर्दयीपणे एका महिला पत्रकाराचे कपडे फाडण्यात आले. हे कोणतं सुशासन आहे? ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चे नारे अखेर पोकळच ठरले अशी तिखट टीका आम आदमी पार्टीचे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संजय बेडिया यांनी केली.
ML/KA/PGB 6 May 2023