अजित पवारांबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अजित पवार ही काम करणारी व्यक्ती आहे त्यामुळे त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे असे मत राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे, ते राजीनामा नाट्य झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामती येथे आले त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.आपण पदापासून दूर होण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोकांच्या आग्रहामुळे तो आपल्याला मागे घ्यावा लागला , मात्र आता पर्यायी नेतृत्व करणारी टीम तयार करण्याचे काम आपण हाती घेणार आहोत असेही पवार यांनी सांगितले.देशातील सद्य स्थितीत भाजपा विरोधकांना एकत्रित करून भाजपाचा पराभव करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, आपण यासाठी प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही पवार यांनी केले आहे.
ML/KA/PGB 3 May 2023