इस्रायलने युक्रेनला केली क्षेपणास्त्ररोधी प्रणालीची मदत

 इस्रायलने युक्रेनला केली क्षेपणास्त्ररोधी प्रणालीची मदत

क्यीव, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया-युक्रेन युद्धात अद्याप तटस्थ राहिलेल्या इस्रायलने युक्रेनला आता एक विशेष मदत जाहीर केली असून यामुळे युक्रेनच्या नागरीकांचे प्राण वाचणार आहेत. इस्रायलने युक्रेनला विशेष क्षेपाणस्त्ररोधी प्रणाली देण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रणालीची अद्ययावत आवृत्ती इस्रायलमध्ये तैनात करण्याच्या आधी युक्रेनला दिली जाणार आहे.या हायटेक प्रणालीला अद्याप नाव देण्यात आलेले नाही आणि याच्या आधीच ते युक्रेनला सोपवण्यात आले आहे.

इस्रायलमधील युक्रेनचे राजदूत येवझेन कोर्निचुक यांनी दिलेल्या माहितीनुसार, कीव्हमध्ये इस्रायली क्षेपणास्त्ररोधी प्रणालीची चाचणी घेतली जात आहे. येत्या काही दिवसांतच युक्रेनच्या महत्वाच्या शहरांत याची स्थापना केली जाईल. जर एखाद्या शहरी भागावर एखादा क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा प्रोजेक्टाईल हल्ला झाला तर ही प्रणाली लगेच अलर्ट पाठवेल. यातून लोकांना वेळीच सुरक्षित ठिकाणी जाता येईल.

येवझेन म्हणाले की, ही सर्वोत्तम क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायलने तयार केली आहे. याची सर्वात आधुनिक आवृत्ती आम्हाला मिळाली आहे. कीव्हमध्ये याची चाचणी घेतली जात आहे. काही दिवसांतच आम्ही आमच्या इतर शहरांत हे इन्स्टॉल करू. याच्या तैनातीनंतर कोणतेही क्षेपणास्त्र, रॉकेट किंवा दुसऱ्या प्रोजेक्टाईल हल्ल्यांपासून नागरिकांना वाचवता येईल. इस्रायलसारख्या तंत्रकुशल राष्ट्राने युक्रेनला केलेल्या या मदतीमुळे रशिया समोर युक्रेनचे पारडे काहीसे जड झाले आहे.

SL/KA/SL
6 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *