आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) मोठी घसरण.

 आठवड्याच्या शेवटी बाजारात (Stock Market) मोठी घसरण.

मुंबई, दि. 6 (जितेश सावंत): आठवड्याची सुरुवात तेजीचा सिलसिला सुरु ठेवूनच झाली. फेडने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करून देखील बाजाराने तेजी टिकवली.कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, यूएस बॉन्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्स मधील नरमाई,काही कंपन्यांचे मार्च तिमाहीचे मजबूत आकडे तसेच एप्रिलमधील विक्रमी GST संकलन ह्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.परंतु आठवड्याच्या शेवटच्या दिवशी या तेजीवर पाणी फिरले, Big fall in the stock market at the end of the week. एचडीएफसीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी 1% पेक्षा जास्त घसरले.

एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी शुक्रवारी प्रत्येकी 6% घसरले जवळपास तीन वर्षांतील एका दिवसातील त्यांची सर्वात मोठी घसरण.गेल्या2 महिन्यांतील बाजारातील एका दिवसातील ती सर्वात मोठी घसरण ठरली.
शुक्रवारी बाजाराने संपूर्ण साप्ताहिक नफा गमावला. Sensex and Nifty declined more than 1 per cent at close on Friday dragged down by a heavy sell-off in index major HDFC twins.

शुक्रवारी यूएस स्टॉकमध्ये तेजी आली. डाऊ जोन्स मध्ये 546.64 अंकांची वाढ झाली.6 जानेवारीनंतरची सर्वात मोठी एकदिवसीय वाढ. यूएस जॉब डेटाचे उत्साहवर्धक आकडे जाहीर झाल्याने मार्केटमध्ये वाढ झाली. शुक्रवारच्या यूएस मार्केट मधील तेजीचा असर भारतीय बाजारावर सोमवारी उमटेल पण बँकिंग क्षेत्रातील कमजोरीचा फटका बाजाराला बसू शकतो.शुक्रवारी बॅंकनिफ्टीत बंद होताना 1,024.25 अंकांची घसरण झाली.

Technical view on nifty-बाजार ओव्हरबॉट झोन मध्ये आहे. शुक्रवारी निफ्टीने 18069 चा बंद भाव दिला.वरच्या स्तरावर निफ्टी 18117-18147-18180-18200-18250 हे टप्पे गाठू शकेल पण बाजार ओव्हरबॉट असल्याने वरच्या स्तरावर नफावसुली होईल.निफ्टीसाठी 18,000-17950-17883 हे महत्वपूर्ण स्तर राहतील हे तोडल्यास घसरण वाढेल व निफ्टी 17842-17828-17797-17759 17722 हे स्तर गाठेल.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष भारताचे 12 तारखेला जाहीर होणारे IIP व CPI आकडे तसेच 10 तारखेला जाहीर होणारे यूएस चे CPI आकडे व FII चे आकडे यावर असेल. बाजारात चढउताराचे प्रमाण जास्त असल्याने गुंतवणूकदारानी गुंतवणूकदारानी थोडी सावधानता बाळगावी व संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.
सलग सहाव्या दिवशी तेजी
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात चांगली वाढ झाली.

बाजार मागील आठवड्यातील तेजीचा सिलसिला सुरु ठेवताना दिसला. सलग सहाव्या दिवशी बाजारात तेजी दिसली. सेन्सेक्समध्ये 300 अंकांची वाढ झाली.बँक, वित्तीय, आयटी, मेटल आणि ऑटो निर्देशांक वरच्या स्तरावर बंद झाले तर एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी निर्देशांक खालच्या स्तरावर बंद झाले. मुख्यत: इंडेक्स हेवीवेट इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील खरेदीमुळे बाजारात चांगली वाढ झाली तसेच एप्रिलमधील विक्रमी GST संकलन यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला.

दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 242 अंकांनी वधारून 61,354.71 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 82.70 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,147.70 चा बंद दिला. Equity benchmarks ended higher on Tuesday

सेन्सेक्सची आठ सत्रातील तेजी संपुष्टात

देशांतर्गत शेअर बाजारातील गेल्या आठ सत्रातील तेजी बुधवारी संपुष्टात आली.यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनच्या व्याजदरांबाबत निर्णयापूर्वी जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणामुळे बाजारात घसरण झाली.दिवसभरात चौफेर विक्री दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि लार्सन अँड टुब्रो या निर्देशांकातील महत्वाच्या समभागातील घसरणीचाही बाजारावर परिणाम झाला.
दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 161.41अंकांनी घसरून 61,193.30 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 57.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,089 चा बंद दिला.

Sensex snaps 8-day winning run
फेडने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करून देखील बाजारात तेजी
विकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराने मागील सत्रातील कमकुवतपणा बाजूला सारून पुन्हा एकदा तेजीकडे वाटचाल केली.अमेरिकन बाजारातील कमजोरीकडे दुर्लक्ष करून (अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजेच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली) भारतीय शेअर बाजाराने आपला तेजीचा ट्रेंड सुरू ठेवला.कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, यूएस बॉन्ड यिल्ड आणि डॉलर इंडेक्स मधील नरमाई हे बाजारासाठी सकारात्मक ट्रिगर ठरले.

काही कंपन्यांच्या मार्च तिमाहीच्या मजबूत आकड्यांनी देखील बाजाराला वरच्या दिशेने जाण्यास मदत केली.तसेच यूएस फेडरल रिझर्व्हने सूचित केले की ते लवकरच दर वाढीचे चक्र थांबवू शकतात त्यामुळे बाजार उसळला. सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 555.95 अंकांनी वधारून 61,749.25 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 165.95 अंकांची वाढ होऊन निफ्टीने 18,255.80 चा बंद दिला. Sensex zooms over 550 pts despite rate hike by US Fed

सेन्सेक्स 695 अंकांनी घसरला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बँकिंग, धातू आणि वित्तीय सेवांच्या समभागातील विक्रीच्या तीव्र लाटेने बाजाराला धक्का बसला.यूएस बाजारातील कमजोरी आणि गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी आज 1% पेक्षा जास्त घसरले.सेन्सेक्स 700 अंकांपेक्षा जास्त घसरला.गेल्या 2 महिन्यांतील बाजारातील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण ठरली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 694.96 अंकांनी घसरून 61,054.29 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 186.80 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,069 चा बंद दिला. Sensex plunges 695 pts

(लेखकशेअरबाजारतज्ञ,तसेचTechnicalandFundamentalAnalystआहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *