उध्दव ठाकरे विकासाला अडथळा करतात

 उध्दव ठाकरे विकासाला अडथळा करतात

कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उद्धव ठाकरे बारसू मध्ये येऊन विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी जात आहेत. त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि मागण्या सांगितल्या तर विरोधासाठी विरोध होणार नाही, असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.Uddhav Thackeray hinders development

उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन सुचवलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतः पत्र देऊन या प्रकल्पाला स्वतः विरोध करणं होत आहे, असं सांगून दीपक केसरकर पुढे म्हणाले, म्हणूनच त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये बरोबर लिहिलं आहे. तुम्ही आत्मचरित्र वाचा म्हणजे तुम्हाला त्यांची कार्यपद्धती कळेल. त्यामुळे त्यावर मी अधिक बोलणं गरजेचं नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

शरद पवार यांनी लिहिल्याप्रमाणं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारायला नको होतं
आणि ते स्वीकारलं होतं तर त्याला न्याय देणं गरजेचं होतं. ते आजसुद्धा पदाला न्याय देऊ शकतात त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणं मुलांच्या रोजगारासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी न्याय देणं गरजेचं असल्याचं पत्रकारांना सांगितलं.

ML/KA/PGB
6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *