मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही

 मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही

रत्नागिरी, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोकणात स्थानिकांचे मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही असा इशारा उध्दव ठाकरे यांनी दिला आहे, रिफायनरी विरोधक गावकऱ्यांच्या भेटीसाठी ते सोलगाव परिसरात आले होते.

मी जन की बात ऐकायला आलो आहे, मन की बात सांगायला नाही , आमचे चांगले प्रकल्प तुम्ही गुजरातला नेले आणि राख रांगोळी करणारे प्रकल्प आमच्या माथी मारत आहात, त्यापेक्षा हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि चांगले प्रकल्प आम्हाला द्या असे ठाकरे यांनी सांगितले.

आम्ही विकासाच्या विरोधात नाही , सुरुवातीला समृद्धी महामार्गाची जमीन घेण्यावरून तिथल्या शेतकऱ्यांचा विरोध होता ,आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहून स्थानिकांच्या समस्या सोडवून मग त्यातून मार्ग काढला. त्याचप्रमाणे आज जसे आम्ही इथे उन्हातान्हात जमलेल्या स्थानिकांचे प्रश्न ऐकायला आलो आहे तसे सरकारने आपले मुद्दे त्यांना पटवून द्यावेत आणि मग रिफायनरी करावी असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना नाणार ला विरोध झाल्याने रिफायनरी साठी ही जागा सुचवली होती मात्र स्थानिक लोकांशी बोलून , त्यांचा विश्वास संपादन करून मग तो प्रकल्प मार्गी लावणार होतो , मात्र आता रिफायनरी साठी डोकी फोडायचे प्रयत्न होत आहेत त्याला आमचा विरोध आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.Development will not be allowed by suppressing issues

ML/KA/PGB
6 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *