राजीनामा फेटाळला, आता चेंडू पवारांच्या पारड्यात
मुंबई दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवण्याच्या शरद पवारांचा निर्णय पक्षाच्या समितीने स्वीकारला नसून त्यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस त्यांनी केली आहे. यामुळे पवार यावर काय करतात ते पाहावे लागेल.
‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्र प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती त्यानंतर गेली तीन दिवस पक्षात भूकंप झाला आहे. पवारांनीच पुढील निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली होती तिची बैठक आज झाली. या बैठकीत राजीनामा देण्याचा मुद्दा चर्चेला आला त्यावेळी त्यावर दोन गट पडलेले दिसून आले, अजित पवारांनी पुन्हा हा निर्णय योग्य असल्याचा मुद्दा मांडला मात्र बहुमताने तो नाकारण्यात आला.
शरद पवार यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात येत असून त्यांनीच पुढील काळात अध्यक्ष राहावे आणि पुढील कारवाई देखील त्यांनीच करावी असा ठराव आज समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पक्षाच्या व्यवस्थेनुसार आता पुढील निर्णय घेण्याची जबाबदारी पुन्हा अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्यावरच आली आहे.आता पवार आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहतात की अन्य पर्याय देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
SL/KA/SL
5 May 2023