कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर, मात्र निर्णय पक्ष हितासाठीच

 कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर, मात्र निर्णय पक्ष हितासाठीच

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पक्ष कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तीव्र भावनांचा आपण आदर करतो मात्र पक्ष हितासाठीच आपण पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन दिवसांपासून धरणे धरून बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पवार यांनी हे वक्तव्य केले. आपण कोणालाही न विचारता हा निर्णय घेतला हे खरे मात्र असे केले असते तर हा निर्णय घेऊच दिला नसता असेही ते म्हणाले.

येत्या एक दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगत तुम्हाला इथे बसण्याची गरज लागणार नाही असे शरद पवार म्हणाले.राज्याबाहेरील नेते , कार्यकर्ते इथे आले आहेत, त्यांच्याशी चर्चा केली आहे. तुमच्या मनासारखा निर्णय बैठकीत घेतला जाईल असेही शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. Respect the sentiments of the workers, but the decision is for the party’s interest

ML/KA/PGB
4 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *