यंदाच्या हंगामात 1052.88 लाख टन ऊसाचे गाळप
पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षीच्या हंगामात १०५२.८८ लाख टन इतक्या ऊसाचे गाळप होऊन त्यातून १०५.३१ लाख टन इतक्या साखरेचे उत्पादन झालेले आहे. तर साखर निर्यातीतून राज्यातील साखर कारखान्यांना 8740 कोटी रुपये मिळाले आहेत.
राज्यातील सात सहकारी साखर कारखान्यांनी सर्वात जास्त ऊसाचे गाळप केले आहेत, यात तीन खाजगी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. तर राज्यात कोल्हापुरातील हांतकणगले तालुक्यातल्या जवाहर शेतकरी साखर कारखान्याने बावीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्यातील 95.74 टक्के साखर कारखान्यांनी शेतक-यांना एफआरपी नुसार ऊसाला भाव देऊन ती रक्कम ही शेतक-यांच्या खात्यात जमा केली आहे.
राज्यात इथेनाँलचे प्रमाण वाढावे याकरता केंद्र सरकार प्रोत्साहन देत असून राज्यातील १२५ सहकारी ,खाजगी साखर कारखान्यांच्या इथेनाँल प्रकल्पांना १०७११ कोटी रक्कमेच्या प्रकल्पास तत्वत मंजुरी दिली आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.1052.88 lakh tonnes of sugarcane bagasse in this season
ML/KA/PGB
4 May 2023