‘गो फर्स्ट’ गेली दिवाळखोरीत
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवाई क्षेत्राला कंपन्या तोट्यात जाण्याचा इतिहासच आहे. आता यात भर पडली आहे ती प्रख्यात वाडीया ग्रुपच्या Go First या विमान कंपनीची. या कंपनीची आर्थिक परिस्थिती एवढी ढासळली आहे की, विमानात इंधन भरायलाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. या कंपनीनं दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. Go First नं आगामी दोन दिवसांची सर्व उड्डाणं रद्द केली असून त्यामुळं, बुकींग केलेल्या प्रवाशांची पंचाईत झाली आहे.
विमानांचं इंजिन बनवणारी अमेरिकन कंपनी प्रॅट अँड व्हिटनीने कंपनीचा इंजिन पुरवठाही अचानक थांबवला. त्यामुळं गो फर्स्टची जवळपास 28 विमानं जमिनीवर उभी करावी लागली आहेत. परिणामी कंपनीचा कॅश फ्लो अडला. ज्याचे थेट परिणाम इंधन खरेदीवर झाले असून, कंपनीकडे सध्या उरलेल्या विमानांचं इंधन घेण्याचेही पैसे नाहीत.
SL/KA/SL
3 May 2023