पवार करणार आपल्या निर्णयाचा फेरविचार

 पवार करणार आपल्या निर्णयाचा फेरविचार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेल्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज सायंकाळी दिली.Pawar will reconsider his decision

दुपारपासून सुरू झालेल्या राजीनामा नाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास अशा प्रकारे पडदा पाडण्याचे काम पवारांनी अजित पवार यांच्याच मार्फत केल्याची चर्चा होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दुपारपासून धरणे धरून बसलेल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे असे आवाहन शरद पवार यांनी केल्याचेही अजित पवारांनी यावेळी माध्यमांसमोर सांगितले.

दुपारी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार आपल्या घरी गेल्यावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून विचार केला आणि मग त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले, दुपारपासून निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून आपला पुढील निर्णय दोन ते तीन दिवसात घेऊ असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे मात्र कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावे अशी अट घातली आहे , याखेरीज कोणीही रस्ता रोको , राजीनामे देणे असे प्रकार करू नयेत असेही शरद पवार यांनी म्हटल्याचे अजित पवारांनी सांगितले यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार देखील उपस्थित होते.

ML/KA/PGB
2 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *