राष्ट्रवादीत खळबळ , कार्यकर्ते बेचैन

 राष्ट्रवादीत खळबळ , कार्यकर्ते बेचैन

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद शरद पवार यांनी सोडण्याचे जाहीर केले आणि पक्षात मोठी खळबळ माजली आहे, कार्यकर्ते सैरभैर , बेचैन झाल्याचे चित्र दिसत आहे.आज दुपारी आपल्या लोक माझ्या सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात पवारांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करीत एकच खळबळ उडवून दिली आहे.शरद पवार यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जे बोलतात त्याच्या नेमके विरूध्द वागतात याची प्रचिती यावेळी देखील दिसते का हे तपासून पाहावे लागणार आहे.पवारांनी घोषणा करताच अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला, इतर नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली, अनेकांनी रडून विनंती केली. कार्यकर्ते यशवंतराव प्रतिष्ठान च्या पायऱ्यांवर ठाण मांडून बसले होते, पवारांनी राजीनामा परत घेईपर्यंत तिथून न हलण्याची त्यांची भूमिका होती.शरद पवार यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमली असून त्यांनी पक्ष नेतृत्वाबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे, एकीकडे हा गदारोळ सुरू असतानाच पवार कुटुंबीयांसमवेत आपल्या सिल्वर ओक या निवासस्थानी निघून गेले. राजकीय जाणकार याचे अनेक अर्थ काढत असून अनेकांना हे पवारांचे धक्का तंत्र वाटत आहे तर काहींनी याची तुलना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याशी केली आहे.

ML/KA/PGB 1 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *