शरद पवारांची निवृत्तीची घोषणा
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेत राहीलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनी आज मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केला आहे.
‘लोक माझे सांगाती’ आपल्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्यावर माझा भर असेल, याशिवाय मी कोणतीही अन्य जबाबदारी घेणार नाही.””
काँग्रेस पक्षातून बाहेर पडून १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून गेली २४ वर्षे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी पक्षांचा पुढील अध्यक्ष कोण हे निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे. या समितीमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे.
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड. इतर सदस्य : फौजिया खान, (अध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस), धीरज शर्मा, (अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस), सोनिया दूहन, (अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)
SL/KA/SL
2 MAy 2023