यंदाच्या आषाढी यात्रेत मोबाईल बंदी नाही

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राचे आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीचे नियोजन सध्या सुरू झाले आहे. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली.Mobile phones are not banned in this year’s Ashadhi Yatra

या बैठकीमध्ये दर्शन रांगेचे व्यवस्थापन मंदिरातील अंतर्गत व्यवस्थापना सोबतच भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत चर्चा झाली. तसेच यंदा आषाढी यात्रेमध्ये मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी नसणार आहे.

आषाढी यात्रा कालावधी साठी विठ्ठल मंदिरातील मोबाईल बंदी मंदिरे समितीने उठवली आहे. मात्र मंदिरात भाविकांनी मोबाईल घेऊन येत असताना मंदिरात मोबाईलचा वापर होऊ नये. याबाबत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन मंदिरे समितीच्या वतीने भाविक भक्तांना करण्यात आले आहे.

आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरपुरात येत असताना, यंदा आषाढी वारकरी भक्तांना मोबाईल वापराबाबतचा मार्ग आता सुकर झाला आहे.

ML/KA/PGB
2 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *