पोलीस नक्षल चकमकीत ३ जहाल नक्षलवादी ठार..

 पोलीस नक्षल चकमकीत ३ जहाल नक्षलवादी ठार..

गडचिरोली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पेरमीली दलम कमांडर कुख्यात नक्षलवादी बिटलू मडावीसह तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाला यश आले आहे.3 Jahal Naxalites killed in police naxal encounter..

गडचिरोली पोलिस दलाला मिळालेला गोपनीय माहितीनुसार रविवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘सी-६०’ पथकाने भामरागड तालुक्यातील केळमारा जंगल परिसरात अभियान राबवले होते.दरम्यान आधीच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी जोरदार गोळीबार केला यात पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.

दरम्यान पोलीस पथकाने सर्चिंग ऑपरेशन केले असता घटनेत जहाल तिन नक्षलवादी ठार झाले .आहेत यामध्ये पेरमीली दलम कमांडर कुख्यात बिटलू मडावी याच्यासह डीव्हीसी वासू आणि अहेरी दलम सदस्य श्रीकांत ठार झाला. काही दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मर्दहूर येथील साईनाथ नरोटे हत्याप्रकरणात बिटलू मुख्य आरोपी होता. तर वासू याची नुकतीच डीव्हीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मर्दिनटोला चकमकीनंतर पोलिसांचे मोठे यश प्राप्त झाले आहे ..

ML/KA/PGB
1 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *