भोर आणि मुळशी तालुक्यातील गावांचे पुनर्वसन पावसाळ्याच्या आत करा

 भोर आणि मुळशी तालुक्यातील गावांचे पुनर्वसन पावसाळ्याच्या आत करा

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्यात भोर तसेच मुळशी येथील काही गावांत पावसाळ्यात भूस्खःलन होत आहे. त्यामुळे जीवितहानी आणि आर्थिकहानी मागील काही वर्षांपासून होत आहे. यात भोर तालुक्यात कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके तसेच भोर मधील इतर गावांना देखील याचा मोठा धोका निर्माण होत आहे.

त्यामुळे सरकारने यागावांचे पावसाळ्यापूर्वी
पुनर्वसन करावे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी पुढील सूचना केल्या आहेत.

भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके गावचे पावसाळ्याच्या आत पुनर्वसन तातडीने करावे. तसेच भूस्खलन होणाऱ्या गावाना मदत करण्यासाठी शासनाने टास्क फोर्स तयार करण्यात यावा. ज्या गावांना भूस्खलन व अतिवृष्टीची भीती आहे अशा गावातील शाळांची मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात याव्यात अशा सूचना केल्या.

यावेळी डॉक्टर गोर्हे यांनी सांगितले की, भोर-महाड रस्त्यावर ४५ घरांचे ३५६ लोकसंख्या असलेले कोंढरी गावातील डोंगरात २०१९ साली भूस्कलन होऊन डोंगर खाली आले होते. या गावांना ज्यावेळी भूस्खलन झाले होते. त्याठिकाणी ३ ऑगस्ट, २०२१ रोजी भेट दिली होती. या ठिकाणच्या अनेक भागात जमिनीला मोठ्या भेगा पडाल्याने गावात भीतीचे वातावरण झाले होते.

गावातील ग्रामस्थांचे त्यावेळी जिल्हा परिषद शाळेत व इतर ठिकाणी गावाबाहेर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. परंतु शाळेत देखील कंबरे इतके पाणी आले होते. तसेच याठिकाणच्या लोकांची परिस्थिती देखील अतिशय वाईट असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.Rehabilitate villages in Bhor and Mulshi talukas during monsoon season

भोर महसूल प्रशासनाने कोंढरी येथील खासगी गायरान २.८२ आर जागेत ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर क्रीडांगण, दवाखाना, बाग, रस्त्यासाठी जागा या कामांसाठी सुमारे 13 कोटी 8 लाख व जागेसाठी 48 लाख 75 हजार असा एकूण 13 कोटी 57 लाख खर्चाचा प्रस्ताव तयार केला असून याबाबत तत्कालीन पालकमंत्री यांनी याबाबत सन २०२१ मध्ये बैठक घेऊन निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र तरी देखील कार्यवाही झाले नसल्याचे समोर येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

ML/KA/PGB
28 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *