स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प

 स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बारसू सोलगाव भागातील सर्व स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प हाती घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

या प्रकल्पाचे फायदे आम्ही गावकऱ्यांना समजावून सांगू , त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पासाठी ऐशी टक्के स्थानिकांचा पाठिंबा आहे. आज कोणाही आंदोलकावर लाठीचार्ज झालेला नाही, आजच्या आंदोलनात स्थानिक लोकांसोबत बाहेरचे लोकही सहभागी झाले होते असे ते म्हणाले.

आपले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून त्यांना सर्व स्थानिकांशी चर्चा करून विश्वासात घेण्यास सांगितले आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याच जागेची शिफारस केंद्राकडे केली होती आता त्यांनी ती बदलली ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका ही शिंदे यांनी यावेळी केली.

आमचा विरोधच

आमच्या सर्व पंचक्रोशीतील ग्रामसभांचा रिफायनरीला विरोधच आहे , तसे ठराव आम्ही मंजूर करून सरकारला पाठवले आहेत अशी माहिती रिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. Refinery project by trusting the locals

सरकार कितीही सांगत असले तरी स्थानिकांचा याला विरोधच आहे, आधी काम थांबवा आणि मगच चर्चा करू अशी आमची भूमिका आहे, कोकणात रिफायनरी सारखे प्रकल्प नकोतच असेच आमचे म्हणणे आहे असेही चव्हाण यांनी सांगितले.

ML/KA/PGB
28 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *