मुंबईत होतोय राज्यातील सर्वांत लांब टनेल रोड

 मुंबईत होतोय राज्यातील सर्वांत लांब टनेल रोड

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे आणि बोरिवली यांना जोडणाऱ्या घोडबंदर रोडवरून प्रवास करताना प्रवासी नेहमीच त्रस्त होतात. अवघ्या २० किमीचे हे अंतर गाठण्यासाठी अवजड वाहनांच्या प्रचंड रांगेतून वाट काढताना तब्बल दोन तास लागतात. हे अंतर आता अवघ्या पंधरा मिनिटात कापता येणार आहे.

बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सर्वात लांब बोरिवली – ठाणे टनल रोडसाठीचं प्रकल्पासाठी लार्सन अँड टुब्रो अर्थात एलएनटी आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोघांना या प्रकल्पाचं काम मिळण्याची शक्यता आहे.

ठाणे – बोरिवली या भुयारी रोडसाठी जवळपास ८९०० कोटींचा खर्च येणार आहे. हा टनेल रोड ११.८४ किमी इतका लांब असणार आहे.या मार्गावर ३ + ३ अशा लेन असतील. अंडर ग्राउंड टनलची लांबी १०.८ किमी असणार आहे. ठाणे – बोरिवली अशा मार्गावर घोडबंदरवरुन जाताना सध्या जवळपास दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र या ठाणे – बोरिवली डायरेक्ट लिंकमुळे हा कालावधी दोन तासांवरुन थेट १५ मिनिटांवर येणार आहे.

SL/KA/SL

27 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *