सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी संगणक प्रणाली

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी  संगणक प्रणाली

मुंबई , दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाचा का म अधिक लोकाभिमुख होण्यासाठी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील चांगल्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) ही नवीन प्रणाली अधिक फायदेशीर ठरणार आहे असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज केले.सी-डॅक व एमआरएसएसी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने विकसित केलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम या संगणक प्रणालीचे (PMIS) उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज वाय. बी. चव्हाण सेंटर येथे करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी मला सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी जेव्हा दिली तेव्हा या विभागामध्ये जी व्यवस्था होती ती व्यवस्था पाहिल्यानंतर मला कळालं की, या विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलून या खात्यामध्ये अधिक सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बदल्यांसाठी व पदोन्नतीसाठी कोणालाही आपल्या हेलपाटे घालण्याची गरज राहणार नाही हे मी माझ्या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या पहिल्याच कार्यक्रमातील भाषणात बोललो होतो असे सांगतानाच मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मी जे बोललो त्याचप्रमाणे मी आतापर्यंत वागलो. कारण आता माझ्याकडे पदोन्नती संदर्भात कोणताही विषय प्रलंबित नाही हे मी आवर्जून नमूद करीत आहे.विभागाचे अभियंता असो वा अधिकारी आम्ही सर्व प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक विभागाच्या अधिका-यांनी आपल्या कामामध्ये अधिक पारदर्शकता आणून आपल्या कार्यपध्दतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे गरजेचे आहे. असेही मंत्री चव्हाण यांनी नमूद केले. पी. एम. आय. एस. व्यवस्थेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित्या येणारे एक लाख पाच हजार किलोमीटर रस्ते त्यांची असलेली सद्यस्थिती काय आहे. 31 हजार पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या इमारती पूल आणि या सर्वांची आताची असणारी परिस्थिती, त्यामध्ये काही कमतरता आहे काय रस्त्यांची किती कामे प्रगतीपथावर आहेत किती कामे अपूर्ण आहेत आदींची माहिती या नवीन संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे.आापल्या विभागाच्या अंतर्गत येणा-या रिजनमधील रस्त्यांवर कुठेही खड्डा पडला असेल तर तो खड्डा आपल्याला दुरुस्त करणे हे आपल्या विभागाचे कर्तव्य आहे. तशी आपल्याकडे व्यवस्था तयार आहे आणि त्या व्यवस्थेमधून आपल्याला हे सर्व करायचं आहे असे सांगतानाच मंत्री चव्हाण म्हणाले की, एकदा पडलेला खड्ड्याला जर दुरुस्त केला नाही तर तो हळूहळू खड्डा वाढत जातो. त्यामुळे पुढील काळामध्ये रस्त्यामध्ये पडणारा जो खड्डा आहे तो फार काळ राहणार नाही, टाईम बाँड पिरियड मध्ये त्याची दुरुस्ती कशी होईल याकडे लक्ष देण्याची आणि यासाठी या विभागाने पूर्ण ताकदीने काम करणे गरजेचे असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुण्याचे मुख्य अभियंता चव्हाण, मुंबई विभागाचे मुख्य अभियंता राजभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/PGB 24 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *