रिलायन्स इंडस्ट्रीजने कमावला विक्रमी नफा

 रिलायन्स इंडस्ट्रीजने कमावला विक्रमी नफा

मुंंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुकेश अंबानींच्या मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)ची मार्च तिमाहीत कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. RIL ने आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १९,२९९ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. हे वार्षिक आधारावर १९ टक्के अधिक आहे.

मुख्य व्यवसाय ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचे करपूर्व उत्पन्न १४.४ टक्क्यांनी वाढून १६,२९३ कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स जिओचा नफा १५.६ टक्क्यांनी वाढून ४९८४ कोटी रुपये झाला आहे.

RIL च्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्येही वाढ चांगली झाली आहे. कॅपेक्स आणि कर्जाबाबत मार्गदर्शन उत्साहवर्धक आहे. O२C चा EBITDA ११ टक्के राहिला, जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. सध्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसमध्येही स्टॉकबाबत क्रेझ वाढली आहे. यासोबतच अनेक आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसनी यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, मोठे लक्ष्य ठेवले आहे.

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नफा १९ टक्क्यांनी वाढून १९,२९९ कोटी रुपये झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील उत्पन्नात वाढ आणि रिटेल आणि टेलिकॉमच्या मजबूत वाढीमुळे विक्रमी नफा झाला आहे.

कंपनीचे उत्पन्न २.८ टक्क्यांनी वाढून २.३९ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील नफा ६६,७०२ कोटी रुपये आहे, जो आजपर्यंतचा सर्वाधिक वार्षिक नफा आहे. RIL चा EBITDA वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढून ४१,३८९ कोटी झाला, जो अंदाजापेक्षा चांगला आहे.

मुख्य व्यवसाय ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचे करपूर्व उत्पन्न १४.४ टक्क्यांनी वाढून १६,२९३ कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स जिओचा नफा १५.६ टक्क्यांनी वाढून ४९८४ कोटी रुपये झाला आहे. तर रिटेल व्यवसायातील नफा १३ टक्क्यांनी वाढून २४१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. RIL चे कर्ज स्थिर झाले आहे.

SL/KA/SL

24 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *