श्रीरामावर सप्तखंडांतील नद्या आणि समुद्रांतील जलाचा अभिषेक
अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदीराचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंदीराचे बांधकाम बहुतांश पूर्ण झाले असताना आता श्रीराम आणि सीतामाईंच्या मूर्ती तयार करण्याचे काम आता सुरू आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी खास नेपाळमधून शाळीग्राम शिळा आणण्यात आल्या आहेत. सातही खंडातील १५५ देशांतील नद्या व समुद्रातील पाण्याद्वारे श्रीरामाच्या बांधकामाधीन मंदिराच्या शिळांवर काल जलाभिषेक करण्यात आला. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले साधू-संत, ४० पेक्षा अधिक देशांचे राजदूत आणि अनिवासी भारतीयही या अभूतपूर्व दृश्याचे साक्षीदार झाले आहेत.
१५५ देशातील नद्या व समुद्राचे हे पाणी अयोध्येपर्यंत पोहोचल्याची ही अनोखी कहाणी आहे. एका नदीचे छोट्याशा कलशात सामावणे व नंतर अयोध्येपर्यंत दीर्घ प्रवास करणे सोपे नव्हते. यासाठी ३१ महिने लागले. याचा संकल्प कोरोनाकाळात केला होता. आता हा संकल्प पूर्णत्वास गेला आहे.
छत्तीसगडने पाकिस्तानची रावी व सिंधू नदी अयोध्यपर्यंत पोहोचवली. येथून एकमेव शादाणी दरबारचे संत युधिष्ठिर लाल यांना अयोध्येसाठी निमंत्रित केले. त्यांना पाकिस्तानातून सिंधू व रावी नदीचे पाणी आणण्याची जबाबदारी दिली होती.
SL/KA/SL
24 April 2023