सॅनिटरी पॅडचा आडून चक्क विदेशी दारूची वाहतूक

 सॅनिटरी पॅडचा आडून चक्क विदेशी दारूची वाहतूक

धुळे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सॅनिटरी पॅडचा आडून गोव्याहून सुरतच्या दिशेने धुळे मार्गे विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुद्देमाला सकट मुसक्या आवळल्या आहेत.

गोव्याहून सुरत कडे धुळे मार्गे आइशर ट्रकमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैधपणे वाहतूक केली जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दारा मार्फत माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला असता, संबंधित आयशर ट्रक पोलिसांना आढळून आला.

हा आयशर ट्रक पोलिसांनी तात्काळ थांबवून ट्रक चालकास विचारणा केली असता, ट्रकमध्ये सॅनिटरी पॅड असल्याचे ट्रक चालकाने सांगितले व याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये सॅनेटरी पॅडच्या आडून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे, या कारवाईमध्ये जवळपास दहा लाखांचा दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून आईसर ट्रक सह 18 लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईदरम्यान हस्तगत केला आहे.

SL/KA/SL

21 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *