राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस आणि गारपीट …
छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सिल्लोड शहरासह तालुक्यातील, अंधारी, पळशी, भराडी व अंभई इतर काही गावात विजेच्या कडकडटासहजोरदार पाऊस झाला . सिल्लोड शहरात इद निर्मित बाजार पेठेत मोठी गर्दी होती मात्र ऐन वेळी जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्याची मोठी तारांबळ उडाली.विदर्भात दुपारी १ नंतर वाशीम जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला असून सर्वत्र ढगाळ वातावरण झाले. जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर या तालुक्यांमध्ये सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. अचानक आलेल्या पावसामुळे हळद काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बुलडाणा जिल्ह्यात दुपार नंतर ढगाळ वातावरण काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला . पुणे शहरात वारजे, कोथरूड परिसरामध्ये अवकाळी जोरदार गारांचा पाऊस झाला आहे, यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती.
ML/KA/PGB 20 APR 2023