विष बाधेतून शेकडो मेढ्यांची मृत्यूशी झुंज सुरू…
छत्रपती संभाजीनगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातील अंधारी शिवारातील गट नंबर ५९७ येथे साहेबराव शिंदे,चिंधा तोरवे, वाल्मीक तोरवे,साहेबराव तोरवे, राहणार कासारी ता. नांदगाव जिल्हा नाशिक येथील या मेंढपाळणी खराते वस्ती येथे जवळपास ५०० ते ७०० मेंढया घेऊन चरण्यासाठी आल्या आहेत,त्या ठिकाणी अचानक पणे मेंढ्या ओरडू लागल्या आणि एक -एक खाली पडून मृत्यूचे तांडव दिसू लागले जवळपास ६० ते ७० मेंढ्या विष बाधा होऊन मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.भाऊराव भालेराव यांनी सांगितले की, सर्व मेंढ्यांना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहेत.या मेंढ्याचे शवविच्छेदन करून वैद्यकीय अहवाल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व मेंढपाळ शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून या घटनेत सदरील मेंढपाळांची जवळपास जवळपास पाच- ते सहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने या सर्व मेंढपाळाना नुकसान भरपाई मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मेंढपाळ ढसा-ढसा रडू लागले
पोटच्या मुला बाळा प्रणाने सांभाळ केलेल्या मेंढ्या उघड्या डोळ्या समोर एक- मांगे एक तडफडून मरु लागल्याने आणि अचानक एकाद्या अपघाताप्रमाने घडलेल्या या घटनेने मेंढपाळ अक्षरशः ढसाढसा रडू लागले आहे.Hundreds of sheep are dying due to poisoning.
ML/KA/PGB
19 Apr 2023