ब्रिटनच्या पंतप्रधानांची संसदीय समितीद्वारे चौकशी
लंडन, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे ब्रिटनचे पहिले पंतप्रधान म्हणून भारतीयांच्या कौतुकाचा विषय ठरलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आता काहीसे अडचणीत सापडले आहेत.
पार्लमेंट कमिशन फॉर स्टँडर्ड्स द्वारे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे प्रकरण ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याशी संबंधित आहे. अक्षता मूर्ती या एका चाइल्ड केअर फर्ममध्ये गुंतवणूकदार आहेत. या कंपनीत सुनक यांनी पत्नीची भागिदारी योग्य पद्धतीने जाहीर केली आहे की ती करत असताना नियमांचं उल्लंघन केलं आहे? या संदर्भातली ही चौकशी आहे.
पार्लमेंट कमिश्नरच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार १३ एप्रिलपासून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयुक्त डॅनियल ग्रीनबर्ग यांनी ही चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं असून त्यांनी यावर राजकारण तापवण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षाचा हा आरोप आहे की सुनक यांनी त्यांच्या पत्नी अक्षता यांची कंपनीत असलेली पार्टनरशिप जाहीर केलेली नाही. खासदार म्हणून ती जाहीर करणं ही सुनक यांची जबाबदारी होती असंही विरोधकांनी म्हटलं आहे.
SL/KA/SL
18 April 2023