ॲपद्वारे सेवा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

 ॲपद्वारे सेवा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत

आरोस, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आता राज्यातील बहुतांश गावांमध्ये इंटरनेट कनेक्शन्स उपलब्ध झाल्यामुळे ग्रामपंचायती देखील माहिती तंत्रज्ञानामध्ये अद्ययावात राहत नेटकेपणे कारभार करू पाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-कोलगाव’ या मोबाईल अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा बुधवारी एकूण १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीत गांधी चौक येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यासह जिल्ह्यात प्रथमच होणाऱ्या या अ‍ॅपच्या माध्यमातून कोलगाववासियांना घरबसल्या सर्व प्रकारचे दाखल्यांसह सुविधा उपलब्ध होणार आहेत.


अशा प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखल्यांसह सुविधा देणारी राज्यातील व जिल्ह्यातील कोलगाव पहिली ही ग्रामपंचायत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्याही ग्रामस्थाला आपले दाखले थेट ऑनलाईन पध्दतीने काढण्यात येणार आहेत.

ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमध्ये जाण्याची गरज नाही तसेच सरपंच किंवा ग्रामसेवक नसला तरी त्याचे काम होणार आहे. या ठिकाणी अ‍ॅपवर मागणी केल्यानंतर संबधित उमेदवाराला थेट डिजिटल स्वाक्षरी असलेला दाखला मिळणार आहे. माहिती तंत्रज्ञानाची ही गंगा आता खेडोपाडी सहज पोहोचू लागल्याने शहर आणि खेड यांमधील अंतर आता कमी होऊन प्रशासकीय कारभार जलद होण्यास हातभार लागत आहे.

SL/KA/SL

18 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *