भर उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारण्याची इच्छा श्रीसदस्यांचीच…
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा हा श्री सदस्यांच्या सांगण्यानुसार सरकारने सकाळी घेतला , मात्र त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या होत्या असा खुलासा आज सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल चौवीस तासांनी केला आहे. Shrisadsya’s desire to accept the Maharashtra Bhushan Award in the sun…
काल झालेल्या या सोहळ्यात तेरा श्रीसदस्य दुपारच्या तळपत्या उन्हात उष्माघात होऊन मरण पावले तर अनेक जण गंभीर आजारी पडले, त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, हा सर्व प्रकार घडल्यानंतर तब्बल चौवीस तासांनी सरकारने पहिल्यांदाच या विषयावर अधिकृत भूमिका मांडली आहे.
या प्रकरणी सरकारला चहूबाजूने घेरले जात असताना त्यांच्याकडून कोणीही काहीच भाष्य करीत नव्हते , हा कार्यक्रम भर दुपारी का घेतला , आलेल्या लोकांना छप्परही का नव्हते याचे उत्तर कोणीच देत नव्हते. दुसरीकडे अमित शहा यांच्या वेळेसाठीच सकाळी कार्यक्रम ठेवण्यात आला अशी टीका विरोधकांनी केली होती.
सांस्कृतिक कार्य विभागाने या संपूर्ण प्रकरणातून अंग काढून घेतले असून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज माध्यमांसमोर येणेच टाळले आहे. शेवटी उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांद्वारे खुलासा करीत सरकारची बाजू मांडली, पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत गप्प बसले असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ही आज या घटनेमुळे आपल्याला क्लेश झाला असून श्री सदस्यांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
ML/KA/PGB
17 Apr 2023