सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

 सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही

बुलडाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्यातील चितोडा येथे महाराष्ट्र् विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी भेट देऊन अवकाळी पावसामुळे तेथील शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच चितोडा येथिल गजानन कवळे या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याने या मृतक शेतकऱ्याच्या कुटूंबाची भेट घेऊन दानवे यांनी त्यांचे सांत्वन केले आहे .The help of the government did not reach the farmers

या वेळी माध्यमांशी बोलताना दानवे यांनी सरकारने नुसती घोषणा केली मात्र अद्याप ही जाहीर केलेली मदत अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही असा आरोप केला आहे . नुकसानग्रस्त व आपत्तीने जीवितहानी झालेल्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याची त्यांनी सरकार कडे मागणी केली आहे .

या दौऱ्यात दानवे यांचे समवेत सेवादलाचे तेजेंद्र सिंग चव्हाण, जालिंदर बुधवांत ,नरेंद्र खेडेकर, वसंतराव भोजने आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी होते.

ML/KA/PGB
15 Apr. 20 23

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *