पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST ची कारवाई

 पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यावर GST ची कारवाई

बीड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंच्या बीडमधील परळीतील वैजनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटीचा छापा, ‘वरच्याकडून आदेश’ आल्याने झाल्याचा आरोप करत पंकजा मुंडे यांनी “महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील साखर कारखाना गेली अनेक वर्षे तोट्यात चालला होता आणि तो चालू नव्हता. ‘कोणताही कर चुकवण्याचा कोणताही हेतू नव्हता”, असा खुलासा केला आहे. तर “कारवाईसाठी पंकजा मुंडे यांचा कारखाना कसा सापडला ? स्व:च्या पक्षाचे लोक डोईजड होतील म्हणून ही कारवाई होतेय का? असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

परळीत वैजनाथ सहकारी साखर कारखाना आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची स्थापना केली. या कारखान्याच्या अंतर्गत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला घेतले होते. या कारखान्यात तयार झालेली साखर कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्याला विकण्यात आली. मात्र त्याचा जीएसटी केंद्र सरकारकडे न भरल्याने जीएसटी चे अधिकारी थेट वैजनाथ कारखान्यात पोहोचले. जीएसटीचा नियम असा सांगतो की प्रत्येक महिन्याला जी साखर विक्री केली जाते त्याचा जीएसटी महिन्याच्या महिन्याला जमा करावा. मात्र 2019 पासून हा जीएसटी भरला नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

परळी वैजनाथ कारखान्यावर जवळपास 16 कोटीचा जीएसटी बुडवण्याचा आरोप आहे. साखर विक्रीतून जो जीएसटी भरणा अपेक्षित होतो तो भरला नाही . ज्यांना साखर विक्री केली त्यांच्याकडून जीएसटी घेतला मात्र तो जीएसटी कार्यालयाला भरला नाही असा आरोप आहे. 2019 पासून ते 2023 पर्यंत जी साखर विक्री झाली त्याचा जीएसटी भरला नाही असे देखील आरोप आहे.

गेल्या सहा ते सात वर्षापासून कारखाना आर्थिक संकटात आहे. तर दुसरीकडे कारखान्याकडे जी जीएसटी बाकी आहे त्या संदर्भात कारखान्याकडून अनेकदा जीएसटी विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः पंकजा मुंडे यांनी अमित शाह यांची देखील भेट घेतल्याचे त्या सांगत आहेत.

SL/KA/SL

14 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *