सोलापूरच्या कन्येची अंध भारतीय महिला क्रिकेट संघात निवड
सोलापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गंगा संभाजी कदम या सोलापूरच्या कन्येची भारतीय अंध महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली. या संघातून निवड झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. गंगा ही सोलापूर येथील भैरू रतन दमाणी अंध शाळेची माजी विद्यार्थीनी असून राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची सदस्य आहे.
महाराष्ट्र व भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इंडियातर्फे भोपाळला झालेल्या शिबिरातून तिची भारतातून ४० महिला खेळाडूंतून अंतिम १७ खेळाडूंमध्ये निवड झाली.
काठमांडु (नेपाळ) येथे २३ ते ३० एप्रिलदरम्यान भारत-नेपाळमध्ये ५ टी-२० सामने व मे २०२३ मध्ये भारताचे इंग्लडविरुद्ध ३ वनडे व ५ टी-२० सामने होणार आहेत.या सामन्यांमधून गंगा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
SL/KA/SL
13 April 2023