हसन मुश्रीफ अटकपूर्व जामीनावर 11 एप्रिलला सुनावणी

 हसन मुश्रीफ अटकपूर्व जामीनावर 11 एप्रिलला सुनावणी

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर मुंबईतील विशेष न्यायालयात आता 11 एप्रिल रोजी सुनावनी होणार आहे.Hasan Mushrif pre-arrest bail hearing on April 11

त्यामुळे ईडी प्रकरणात तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असेल. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. दरम्यान, मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी संरक्षण दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते.

ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, “मुश्रीफ यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही आणि तीन समन्स बजावूनही ते हजर झाले नाहीत आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरच हजर झाले. त्यांची चौकशी कोल्हापुरात नोंदवलेला एफआयआर आणि कंपनी रजिस्ट्रारने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे.” सरसेनापती संताजी शुगर घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे शेअर्सच्या रुपात शेतकर्‍यांकडून 10 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. 2011 मध्ये लोकसहभागातून साखर कारखाना उभारण्यासाठी निधी उभारताना मुश्रीफ यांना भांडवलाची गरज असल्याचा दावा ईडीने केला आहे.

ML/KA/PGB
5 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *