२०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या आणि धार्मिक मुद्द्यावर

नागपूर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या निमित्ताने धार्मिक मुद्द्यावर लढली जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही. विरोधी पक्ष म्हणून देशातील राष्ट्रीय प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं जाऊ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
ते आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते , भाजप सोडून अन्य पक्षांना एकत्रित करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .
आज नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली तेव्हा नितीन गडकरी यांनी वसंतदादा शुगर ईंस्टिट्यूट यांचे सेंटर नागपूर येथे व्हावे अशी सूचना केली होती. त्यामुळे आता एक केंद्र नागपूर येथे सुरु करत आहोत अशी माहितीही शरद पवार यांनी यावेळी दिली . राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्रित आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
1 April 2023