जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी गिरवतायत जर्मन भाषेचे धडे
बीड, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा परिषद शाळा आता उपक्रमशील शाळा म्हणून पुढे येत आहेत. विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत अव्वल ठरत आहेत. अशाच बीड जिल्ह्यातील
उमरद खालसा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी चक्क जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत.
इथले विद्यार्थी अगदी पोपटासारखी जर्मन भाषा बोलत आहेत. त्यामुळं ही शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली आहे. बीड तालुक्यात असणाऱ्या उमरद खालसा गावातील जिल्हा परिषद शाळेत एकाच छताखाली अगोदर मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेचे ज्ञान आणि धडे दिले जायचे..मात्र आता या शाळेतील विद्यार्थी जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत.
विशेष म्हणजे ही जर्मनी भाषा ते पोपटासारखी बोलत आहेत. जर्मन भाषा शिकून विदेशात जायचे आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. असं येथील मुलांचे स्वप्न आहे.
ही जर्मनी भाषा शिकतांना खूप चांगले वाटते, गेल्या 3 महिन्यापासून आम्ही जर्मन भाषा शिकत आहोत. आम्हाला 7 लेव्हल पार करायच्या आहेत. आज ही भाषा शिकतांना विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटतो आहे.
याविषयी शाळेतील शिक्षक विकास परदेशी म्हणतात की आम्ही हे जर्मन भाषा प्रशिक्षण नोव्हेंबर महिन्यात सुरू केले आहे. मराठी , हिंदी, इंग्रजी, आणि त्याचबरोबर जर्मन भाषेचे धडे देत आहोत. आम्हाला यासाठी मूळचे सांगली जिल्ह्यातील असणारे आणि सध्या जर्मनी येथे स्थायिक असणारे केदार जाधव सर यांचं मोठं सहकार्यालाभत आहे. ते तिथून आमच्या मुलांना जर्मनी भाषेचा ज्ञान शिकवतात. त्यामुळे आमची मुले देखील या ठिकाणी जर्मनी बोलत आहेत.
मनापासून ठरवलं तर जिल्हा परिषद शाळातील शिक्षक काहीही करू शकतो. जिल्हा परिषद शाळेने खूप मोठे अधिकारी घडवलेत आणि आज आम्ही या एका छताखाली चार भाषेचे ज्ञान देण्याचे काम विद्यार्थ्यांना करत आहोत. असं विकास परदेशी सरांनी सांगितलं.
त्यामुळं जर्मनी बोलणाऱ्या इथल्या विद्यार्थ्यांसह शाळेची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
ML/KA/SL
30 March 2023