सव्वा किलो चांदीतून साकारली राममंदिराची प्रतिकृती
वर्धा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रामजन्म निमित्ताने वर्धा जिल्ह्यातील विविध राममंदिरात सकाळ पासून भक्तिभावाने राम भक्त दर्शन घेत आहेत. अयोध्येला भव्य राममंदिराचे निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात सव्वा किलो चांदीतून अयोध्या येथील निर्माणाधिन राममंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
वर्धेतील मनोहर तुकाराम ढोमणे ज्वेलर्सने दिल्लीहून ही प्रतिकृती तयार केली. श्रीराम नवमीनिमित्त वर्धेच्या गोल बाजार येथील श्रीराम मंदिरात दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या राममंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी सात ते आठ कारागिरांना एक महिन्याचा कालावधी लागला आहे. या चांदीच्या प्रतिकृतीत आकर्षक कोरीव काम करण्यात आले आहे.
ML/KA/SL
30 March 2023