विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी केली. पुढील पावसाळी अधिवेशन १७ जुलै रोजी होणार आहे.
या अधिवेशनात १८ दिवस कामकाज झाले. त्यात एकूण १६५.५० मिनिटांच्या कामकाजात ४ तास ५१ मिनिटे तहकूबीमुळे वाया गेले तर दर रोज ९ तास १० मिनीटं सरासरी कामकाज करण्यात आले.
प्रश्नोत्तरांच्या तासाला ५०६ प्रश्न स्विकृत झाले त्यातील ७५ प्रश्नांची चर्चा झाली. लक्षवेधी मध्ये ५०५ पैकी १४५वर चर्चा झाली. एकूण १७ विधेयकापैकी १७ वर चर्चा होवून ती मंजूर करण्यात आली.२९३ च्या ५ चर्चा झाल्या अशी माहिती अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली.Budget Session of Legislature adjourned
ML/KA/PGB
25 Mar. 2023