राहुल गांधी प्रकरणी विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

 राहुल गांधी प्रकरणी विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

राहुल गांधी प्रकरणी विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई काय केली याची माहिती द्यावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी आज सकाळी नियमित कामकाज सुरू होताच केली , त्यावर दिवसभरात निर्णय देतो असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले, मात्र समाधान होत नसल्याने त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही त्या मागणीला पाठिंबा दिला.
राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारणाऱ्यांवर काय कारवाई केली असे त्यांनी विचारले. हा विषय दोन्ही सदनाच्या सदस्यांशी संबधित असल्याने या विषयावर आपण विधानपरिषद उपसभापतींचीशी चर्चा केली आहे, लवकरच निर्णय घेतला जाईल असं अध्यक्ष म्हणाले , मात्र विरोधी पक्ष सहमत झाले नाही , त्यांनी जागेवर उभे राहून घोषणा सुरू केल्या .

या दरम्यान प्रश्नोत्तरे सुरू करण्यात आली, मात्र आताच निर्णय द्या अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली, त्याला प्रतिसाद मिळाला नाही, याचा निषेध म्हणून विरोधक सभागृहातून बाहेर पडले आणि दिवसभर त्यांनी कामकाजावर बहिष्कार घातला.

विधान भवनातील पायऱ्यांवरती विरोधकानी काळापट्ट्या तोंडाला बांधून मूक आंदोलन केले .

विरोधकांच्या अनुपस्थितीत सभागृहात पोलीस सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. सहकारी संस्था सुधारणा विधेयक ही मंजूर करण्यात आले, या विधेयकाला विरोधी पक्षाच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला होता, त्यासाठी सर्व पक्षीय गट नेत्यांची बैठक ही घेण्यात आली होती. Opponents boycott work in Rahul Gandhi case

ML/KA/PGB
25 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *