सांगली बँकेच्या गैरकारभाराची चौकशी आता एस आय टी मार्फत

 सांगली बँकेच्या गैरकारभाराची चौकशी आता एस आय टी मार्फत

सांगली बँकेच्या गैरकारभाराची चौकशी आता एस आय टी मार्फत

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगली जिल्हा सहकारी बँकेत झालेल्या कर्ज वाटप आणि नोकर भरती गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करून चौकशी करण्याची घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा प्रश्न संजय सावकारे यांनी उपस्थित केला होता.

याबाबत २०२१ साली चौकशी जाहीर होऊनही तत्कालीन सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती त्यामुळे चौकशी झालीच नाही अशी माहिती सावे यांनी दिल्यावर सत्तारूढ सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते, प्रकाश आबिटकर, हरिभाऊ बागडे, सुभाष देशमुख , बच्चू कडू यांनी जोरदार आक्षेप घेतले, यानंतर एस आय टी स्थापन करण्याची घोषणा मंत्री सावे यांनी केली.

नागपुरात आता गुंठेवारी लागू

नागपुर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात नव्याने गुंठेवारी लागू करण्यात येईल आणि त्यामुळे तिथे बंद असलेली कागदपत्रे नोंदणी पुन्हा सुरू केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
याबाबतचा प्रश्न विकास कुंभारे यांनी उपस्थित केला होता, त्याला कृष्णा खोपडे यांनी उप प्रश्न विचारला होता.

रॉयल्टी स्थानिक विकासासाठी

राज्यातील गौण खनिज उत्खनन करताना मिळालेली रॉयल्टी अर्थात करवसुली स्थानिक रस्ते आणि इतर सोयी सुविधा यांच्यासाठी खर्च करण्याच्या सूचना दिल्या जातील अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला होता. Sangli bank malpractice probe now through SIT

ML/KA/PGB
25 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *