मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांसाठी छाननी प्रक्रिया लवकरच
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील गिरणी कामगारांना देय असणारी घरे देण्यासाठी १ लाख ७४ हजार अर्जांची छाननी प्रक्रिया महिनाभरात सुरू केली जाईल आणि त्यानंतर कालबध्द कार्यक्रम आखून पात्र लोकांना घरे दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील राणे यांनी उपस्थित केली होती, त्यावर कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर , प्रकाश आबिटकर यांनी उप प्रश्न विचारले होते. सध्या २४१७ घरांचं वितरण कोन, पनवेल येथे देण्यात आली होती मात्र कोविड काळात ती वापरली गेल्यानं ती खराब झाली आहेत , त्यांची दुरुस्ती करून देण्यात येतील असं फडणवीस म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेशातील ११० एकर जमीन गिरणी कामगारांच्या घरांच्या साठी देऊ केली गेली आहे. त्यापैकी गुरचरण, आदिवासी राखीव जागा सोडून उर्वरित जागेवर आमदार सुनील राणे यांची समिती नेमून घर बांधणीचा कार्यक्रम आखला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं.Scrutiny process for mill workers houses in Mumbai soon
ML/KA/PGB
25 Mar. 2023