ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

 ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

NEW YORK, NY – MAY 10: Actor Mohan Agashe from “Astu” attends the 2014 NYIFF Closing Night Screening Of “Goynar Baksho” at NYU Skirball Center on May 10, 2014 in New York City. (Photo by Slaven Vlasic/Getty Images)

पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यभूषण फांऊंडेशनतर्फे गेल्या 33 वर्षांपासून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मोहन आगाशे यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.

याबरोबरच सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे. या जवानांमध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा समावेश आहे.

स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. जुलै महिन्यात पुण्यभूषण पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.

यापूर्वी विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोचविणाऱ्या 33 ज्येष्ठ पुणेकरांना गौरविण्यात आले आहे. तर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, व्यंकय्या नायडू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह महाराष्ट्राचे सर्वच माजी मुख्यमंत्री, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटपटू कपिल देव, सचिन तेंडुलकर, आदीं मान्यवरांनी पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मान केला आहे.

SL/KA/SL

23 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *