आता महिलांसाठी ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा

सोलापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या धर्तीवर आता ताराराणी महिला केसरी स्पर्धा आयोजित करण्यात येत असून चांदीची गदा आणि १० लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.Now Tararani Women Kesari Wrestling Tournament for Women
क्रीडाप्रेमी साठी आता सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत पुरुषांसाठी राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा असायची. याच धर्तीवर आता ताराराणी महिला केसरी स्पर्धेचे ५ मे रोजी अकलूज येथे ताराराणी महिला आखाडा यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. मानाची चांदीची गधा आणि 1 लाख रुपये असे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे.
साधारण १० लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रकमेची बक्षिसे पहिल्या गटापासून असणार आहेत. सदरची स्पर्धा मॅटवर असणार आहे, राज्य कुस्तीगीर परिषदेकडून अद्याप महिला साठी कुस्ती स्पर्धा होत नाही. अशातच राष्ट्रीय स्तरावर सर्व वयोगटातील कुस्ती पटू साठी आता ताराराणी महिला केसरी स्पर्धा होत आहे. त्यामुळे निश्चितच आता अकलूज येथील ताराराणी महिला केसरी स्पर्धा राज्यात नवी दंगल घडवेल.
ML/KA/PGB
20 Mar. 2023