मराठवाड्यातील हळद व्यापारी सांगलीत

सांगली, दि. २०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात यावर्षी हळदीचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे , राजापुरी हळदीची आवक 77 हजार क्विंटल वरून 19 लाख क्विंटल वर गेली आहे यामुळे मराठवाड्यातील हळद व्यापारी खरेदीसाठी सांगलीत येत आहेत.
यापुढे हळदीच्या उत्पादनावर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे, सांगली परिसरात पिकवली जाणारी दर्जेदार राजापूर हळद वायदे बाजार सचोटीचा व्यापार व हळद पॉलिश प्रक्रियेचे 50 हून अधिक कारखाने यामुळे हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हळद व्यवसायाचे सेंटर आता सांगली ऐवजी मराठवाडा होऊ लागले आहे .
नांदेड हिंगोली बसमत जिल्ह्यात हळदीचे उत्पादन दहा लाख पोत्यावरून चाळीस लाख पोत्यावर गेले आहे. विदर्भातील जळगाव जामोद मध्येही हळदीचे उत्पादन वाढले आहे. निजामाबाद , तेलंगणा येथेही हळदीच्या उत्पादनात 15 लाख पोत्याने वाढ झाली आहे. मराठवाड्याचे व्यापारी हळद खरेदीसाठी सांगली बाजारात येत आहेत. हळद प्रक्रियेची सर्वाधिक यंत्रणा सांगली परिसरात उपलब्ध आहे.
ML/KA/SL
20 March 2023