येत्या आठवड्यात कोकणात येणार उष्णतेची लाट
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून कोकणात मळभाचे वातावरण आणि भणाणता वारा असे हवामान अनुभवास येत आहे. अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकरी काहीसे धास्तावले होते. मात्र आता मळभाची स्थिती दूर होऊन येत्या आठवड्यात कोकणात उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात किमान तापमानात वाढीची शक्यता आहे. आगामी आठवडा भर उन्हाची दाहकता वाढणार असून उष्ण लाटेची शक्यात किनारपट्टी भागात विस्तारत जाणार आहे. रत्नागिरीत गुरुवारी सकाळच्या सत्रात 31 अंश तापमानाची नोंद झाली. दुपारपर्यंत त्यामध्ये चार अंशाची भर पडली. रायगडमध्येही तापमानाचा पारा चढता राहिला असून, 37 अंश सेल्सिअस तापमानाचा चढता पारा राहिला. त्यामुळे पुढील आठवड्यात कोकणातील जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.
SL/KA/SL
11 March 2023