किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील न्यायालयीन कागदपत्रे मिळविल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत..
मुश्रीफ फसवणूक प्रकरणी न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत सोमय्या यांनी कशी मिळवली, याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.प्रधान जिल्हा न्यायाधीश पुणे यांच्यामार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे.Court orders inquiry into Kirit Somaiya
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हे आदेश देतानाच मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत म्हणजेच 24 एप्रिल 2023 पर्यंत कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण दिले आहे.
ML/KA/PGB
10 Mar. 2023