BSNL सुरू करणार 4G सेवा

 BSNL सुरू करणार 4G सेवा

मुंबई,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या गर्दीमध्ये काहीशी हरवून बसलेली भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही सरकारी टेलिकॉम कंपनी आता आपल्या सेवा अद्ययावत करण्यास सज्ज झाली आहे. BSNL आता लवकरच 4G सेवा सुरू करणार आहे.

बीएसएनएलने एप्रिल महिन्यापासून व्यावसायिक 4G सेवा सुरु करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून काही उपकरणे खरेदी करत आहे. मागील महिन्यामध्ये कंपनीने TCS कन्सोर्टियमकडून उपकरणांसाठी तब्बल २४,५०० कोटींचा करारारला मंजुरी दिली आहे.

सुरुवातीला पंजाब राज्यामध्ये फिरोजपूर, अमृतसर आणि पठाणकोट या तीन जिल्ह्यांमध्ये ४ जी सेवा लॉन्च केली जाणार आहे. ४ जी सेवा लॉन्च करण्यासाठी BSNL च्या पायलट प्रोजेक्टचा हा एक भाग आहे. अजून टीसीएसच्या अंतिम निविदेला सरकारची मंजुरी मिळणे बाकी आहे. टीसीएसला १ लाख ४ साईट्ससाठी मार्च महिन्याच्या शेवट्पर्यंत सरकारची मान्यता मिळू शकते. कंपनी पंजाबमधून या सेवांसाठी टेस्टिंग सुरू करणार आहे.

मधल्या काळात आलेली मरगळ झटकून अद्यावतीकरणाकडे लक्ष देण्याचा BSNL चा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

SL/KA/SL
8 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *