राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस

 राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस

नंदुरबार, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह,विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना फटका बसला असून, लाखो रुपयांचे पीक वाया जाणार आहे.

नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी ४.०० वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.वाजेनंतर वादळ, वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने होळी सणाला महत्व आहे. बहुतांशी ठिकाणी होळी धामधुम सुरु होती.

सायंकाळी सोसाट्याचा वारा वादळ सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. बाजारपेठेच्या गावांमधे सायंकाळी दुकांदारांमधे मोठी धावपळ उडाली होती. सायंकाळी ६.०० वजता पावसाने थोडी उसंत घेतली मात्र रात्री होळी पेटणार असल्याने होळीला व्यत्यय आला. जिल्यातिल सर्व तालुक्यात सारखीच परिस्थिती होती.Rain with strong winds at many places in the state

पालघर मध्येही पाऊस

पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागांत काहीवेळा पासून ढगांच्या गडगडाटासह आणि विजांसह पाऊस सुरू आहे. बोईसर परीसरातल्या धनानीनगर भागांत ढगांच्या गगडाटासह विजांसह जोरदार पाऊस सुरू…

जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान बोईसर च्या धनानीनगर भागांत काही काळ छोट्या गारांचा पाऊस झाला…या अवकाळी पावसामुळे आंबा आणि इतर पिकांचं नुकसानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे..

ML/KA/PGB
6 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *