मनिष सिसोदिया यांना न्यायालयीन कस्टडी
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माझी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दिल्लीतल्या अबकारी धोरणाच्या प्रकरणात २६ फेब्रुवारीला अटक केली. सहा मार्चपर्यंत त्यांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मनिष सिसोदियांना कोर्टाने २० मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे
सीबीआयने दिल्ली मद्य धोरण प्रकरणात मनिष सिसोदिया यांना दिल्लीच्या न्यायालयात हजर केलं होतं. सीबीआयने कोर्टाकडे मनिष सिसोदियांची रिमांड मागितली नाही. कोर्टाने यानंतर २० मार्चपर्यंत मनिष सिसोदियांना न्यायालयीन कोठडीत धाडलं आहे. सीबीआयने हे म्हटलं आहे आम्ही त्यांचा ताबा मागत नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये त्यांची चौकशी केली जाईल. गेल्या वेळी जेव्हा मनिष सिसोदियांना न्यायालयासमोर आणलं गेलं होतं तेव्हा त्यांची रिमांड वाढवण्यात आली होती. मात्र न्यायालयापुढे सीबीआयने कुठलीही मागणी केलेली नाही. त्यामुळे मनिष सिसोदियांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडीत सिसोदियांना तुरुंगात औषधं, डायरी, पेन, चष्मा आणि भगवद्गीता ठेवण्याची संमती देण्यात आली आहे. आपल्याला विपश्यनेच्या कोठडीत ठेवण्यात यावं अशीही विनंती कोर्टाला केली. त्यावर तुरुंगांच्या नियमांनुसार विचार व्हावा असं न्यायाधीशांनी म्हटलं
SL/KA/SL
6 March 2023